पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, औरंगाबाद.


सन १९९७ साली मा. पोलीस आयुक्त साहेब श्री उल्हास जोशी यांचे अध्यक्षते खाली झालेल्या दरबारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पोलीस पतसंस्था स्थापन करावी या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बी.जी. सुरासे (सुरासे मामा) यांनी प्रस्ताव मांडला व तो दरबारात मान्य करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - श्री सुरासे मामा व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने दिनांक १० मार्च १९९७ रोजी संस्थेची नोंदणी झाली.

सन १९९७ ला लावलेले एक छोटेशे रोपटे आज एक वट वृक्ष झाले आहे, संस्था पहिल्या दिवसा पासून ते आजपावेतो उत्तरोत्तर प्रगत व समृद्ध होत आहे, आज संस्थेचे एकूण सभासद संख्या जवळपास ३००० आहे. हे कल्पवृक्ष यापुढेही निरंतर प्रगती करत राहील हा सर्व पोलीस कर्मचारी बांधवांना तसेच संचालक मंडळ यांना आत्मविश्वास आहे.